इ एम आय ! इ एम आय !!इ एम आय !!!

एम आय ! एम आय !! एम आय !!!

 

सगळे जण शांत पणे बसले होते. निशित मोबाइलला पाहत होता असे म्हणणेच बरोबर होते कारण फोन बंदच होता. सोनी कॉमिक चे पुस्तक चालत होती. निधी खिडकीबाहेर पाहत होती.समर चहाचा कप संपला होता तरी त्याने तो हातातच ठेवला  होता. एक विमनस्क शांतता घरात पसरली होती. १२०० चौरस फुटाचा पॉश फ्लॅट जणू एखाद्या कॉम्पुटर प्रमाणे हँग झाला होता.शनिवारची सुटी होती संध्याकाळचे वाजत आले होते पण पहाटे  पाच ची शांतता होती. एरवी या वेळी शनिवारी तुफान गडबड असायची. चौघांचे चार प्लॅन असायचे कुणाला  मॉल ला जायचे कुणाला बागेत कुणाला हॉटेल तर कुणाला सिनेमा शेवटी मतदान घेऊन निर्णय व्हायचा.

आज तसे काही नव्हते. गेले तीन महिने जरी कोरोना सर्वव्यापी झाला होता तरी घरून कामामुळे  फार जास्त फरक पडला नव्हता. सगळे एम आय  घराचे, दोन्ही कार्स चे, टी व्ही इतर गोष्टींचे हप्ते बिनभोबाट जात होते. मागच्या युरोप ट्रिप चे हप्ते पण चालले होते.

दोघांनाही मिळून रु..०० लाख मिळत होते. त्यातून .५० लाख इनकम टॅक्स सहित कापले जात होते हातात रोख ५००००.०० मिळत असल्याने सगळे सुशेगाद होते.कोरोना मुळे थोडासा बदल झाला पण शाळा कॉलेज बंद असल्याने जास्त फरक पडला नाही. दोघांचे घरून काम सुरळीत चालले होते.

पण काल निधी ला एच आर चा फोन आला .तिने थंडपणे सांगितले  कि हातावरचे प्रोजेक्ट  अचानक रद्द झाले आहे सबब या प्रोजेक्टवरील सगळेच मस्टर बाहेर. पगाराचा हिशेब करून तिच्या खात्यात नंतर जमा होणार होते. कंपनीत जाऊन देण्यासारखे काहीच नव्हते. लॅपटॉप ही घरचाच होता. संध्याकाळी कनेक्शन कट झाले.

निधीला तर असे वाटले कि तिचे बाह्य जगाशीच सगळेच कनेक्शन कट झाले. डोळ्यासमोर सगळे एम आय नाचू लागले. आणि आता तिला हळू हळू गेल्या पंधरावर्षापासूनचे सगळे आयुष्य आठवत गेले

दोघे हि सामान्य कुटुंबातले. हौस मौज करायला काहीच वाव नाही. ऑफिस मध्ये ओळख झाली. लग्न झाले. हळू हळू सुबत्ता येत गेली. दहा वर्षांपूर्वी एक दिवस खाजगी बँकेचा एक दूरच्या ओळखीचा मुलगा आला. त्यानेच मग फ्लॅट पाहून दिला. त्यानेच दोघांच्या पगारात बसेल असं धडाधड  लोन करून दिले. सगळं घरबसल्या. मग विमा, मग कार, मग दुसरी कार, मग अद्यावायत घर करा या स्कीम मध्ये   पॉश इटालियन फर्निचर,आधुनिक रंगकाम परत स्मार्ट टी व्ही , सी ,वगैरेचे लोन. सब कुछ एम आय. सगळे जॉईंट पगारावर. अगदी " आता कशाला उद्याची बात, चला करूया आजचीच  बात "

वेळो वेळी दोघांच्या आई वडलांनी सल्ला दिला होता कि सगळे एकाच्याच पगारात भागवा. दुसऱ्याचा पगार शिल्लक टाका म्हणजे शिक्षण, लग्नात अडचण होणार नाही. पण ऐकतो कोण. ते चौघेही आता नव्हते. ते इतक्या सामान्य परिस्थितीत  रहात होते कि शेवट पर्यंत भाड्याच्या घरात राहत होते.

हे सगळे निधीला डोळ्यासमोर लक्ख दिसत होते. आता काय करायचे. एकाच्या पगारात दोघांचे .एम.आय.कसे भरणार. तिला समोर वसुली ची माणसं दिसू लागली. त्यांचे फोन उगाचच ऐकू येऊ लागले. काही कळेना. ती पूर्णपणे भाम्बावून गेली. समर कडे पहिले तर तो लॅपटॉप मध्ये पाहत होता. मुलं आपल्याच तंद्रीत होती.परिस्थिती फार कठीण दिसत  होती.

तिने स्वतःला सावरले. तिला सहजच टाइम्स मधील एक बातमी आठवली कोरोना नंतर ची जग कसे असेल याची त्यात दिलेली झलक आठवली. तिने मुलांना खायला केले, चहा केला. काही झाले नाही असेच भासवले. पण मनात निश्चय झाला होता. रात्री जेवणं झाली जनरल गप्पा झाल्या.मुलं झोपायला गेली. समर ती दोघेही बेडरूम मध्ये आले.

समरला किंचितसा अंदाज आला होता कि आज निधी काहीतरी बोलणार,पण काय हे कळत नव्हते. आवरा आवरी झाल्यावर दोघे बसले."बोल काय म्हणते "समर तिला म्हणाला. तिने आधी सगळया परिस्थितीचा आढावा घेतला आणि म्हणाली कि आता एकाच्या पगारात दोघांचे एम आय अशक्य. तेव्हा आता काहीतरी करावे लागेलच. त्यावर समरचे उत्तर ' पाहूत नंतरनिधी तयारच होती ती म्हणाली " नाही नाही आत्ताच प्लांनिंग करूयात. मग तिने सगळं हिशोब काढला. फ्लॅट, फर्निचर, सगळे सगळे विकून हे सगळे एम आय कमी होत होते. समरला म्हणाली " आपण मध्यम शहरात राहुयात तेथे लहान घर घेऊ यात. फक्त तुझ्या पगारात जे .एम.आय बसतील तेव्हढेच लोन घ्यायचे. तिला हे माहित होते कि समर घरून काम करू शकतो तसेच कंपनीने सर्वाना महिन्यातून एकदा ऑफिसात यायची सूट दिली होती.

समरने आढेवेढे घेत होकार दिला. निधी म्हणाली " एकाच्या पगारात जे होईल तेच करायचे." दुसऱ्याचा पगार हा बोनसच समजायचा. दुसऱ्यादिवशी तिने बँकेत फोन केला सांगितले कि त्यांना सगळी  कर्जं बंद करायची आहेत. बँकेने आढेवेढे घेतले पण ती ठाम  राहिली. बँकेलाहि  कळले के एकाच्या  पगारात दोघांचे एम आय जमत नाही.

मुलं समजूतदार होतीच. ज्या शहरात जायचे होते तेथे घर भाड्याने मिळाले कारण तेथे ओळखीचे लोक होतेच. आठ दिवसात सामान हलवले. ज्याने दोघ्यांच्या पगारात एम आय बसवून सगळे घेऊन दिले होते त्यानेच सगळे विकायचे लोन बंद करायची व्यवस्था केली.

नव्या  गावात  2 आठवडे क्वारंटाईन  करून करून झाल्यावर, मुलांच्या  शाळा ऑनलाईन झाल्यावर सगळे स्थिरस्थावर झाले. नवे जीवन सुरु झाले. स्थानिक बँकेच्या मुलाचा फोन आला कि लोन च्या भरपूर स्कीम्स आहेत येऊ का.

निधी म्हणाली" कृपया करून नका येऊ आम्ही एकाच्या पगारात व्यवस्थित भागवत आहोत. एम आय हा शब्द आमच्या जीवनातून आता आम्ही हद्दपार केला. तो खलनायक आमच्या आयुष्यात परत नको." समर मागून ऐकतच होता" तो ओरडला " एम आय मुर्दाबाद"  

 

Chandramohan  D Deshpande

Mb.8888827692     

 


Comments