Posts

इ एम आय ! इ एम आय !!इ एम आय !!!

इ एम आय ! इ एम आय !! इ एम आय !!!   सगळे जण शांत पणे बसले होते . निशित मोबाइलला पाहत होता असे म्हणणेच बरोबर होते कारण फोन बंदच होता . सोनी कॉमिक चे पुस्तक चालत होती . निधी खिडकीबाहेर पाहत होती . समर चहाचा कप संपला होता तरी त्याने तो हातातच ठेवला   होता . एक विमनस्क शांतता घरात पसरली होती . १२०० चौरस फुटाचा पॉश फ्लॅट जणू एखाद्या कॉम्पुटर प्रमाणे हँग झाला होता . शनिवारची सुटी होती संध्याकाळचे ५ वाजत आले होते पण पहाटे   पाच ची शांतता होती . एरवी या वेळी शनिवारी तुफान गडबड असायची . चौघांचे चार प्लॅन असायचे कुणाला   मॉल ला जायचे कुणाला बागेत कुणाला हॉटेल तर कुणाला सिनेमा शेवटी मतदान घेऊन निर्णय व्हायचा . आज तसे काही नव्हते . गेले तीन महिने जरी कोरोना सर्वव्यापी झाला होता तरी घरून कामामुळे   फार जास्त फरक पडला नव्हता . सगळे इ एम आय   घराचे , दोन्ही कार्स चे , टी व्ही व इतर गोष्टींचे हप्ते बिनभोबाट जात होते . मागच्या युरोप ट्रिप चे हप्ते पण चालले होते . दोघा

निष्काळजीपणा आणि प्रामाणिकपणा

निष्काळजीपणा आणि प्रामाणिकपणा १९७५ - १९७७ या काळात बलसाड [ गुजरात ] मध्ये कॅशियर होतो . पगार ५०० सुद्धा नव्हता . बॅचलर लाईफ होते . शाखा ११ ते ६ अशी होती . काम फार जास्त नव्हते . मस्त चाललं होतं . सगळे ग्राहक गुजराती होते . या लोकांचं एक वैशिष्ट होतं . या लोकांना काम करवून घेण्यात रस होता . तक्रार इत्यादी करण्यात विश्वास नव्हता . मी राहायला एका बिल्डिंग मध्ये एका रूम मध्ये होतो . रूम्स पुढील भागी होत्या व मागे गच्ची , बाथरूम होती . बलसाड ला मुंबई   सारखाच पाऊस पडतो व पूर्ण चार महिने पडतो . बलसाड पासून ५ किलोमीटर जवळ समुद्र आहे . त्या वेळी एक आठवडा सतत पाऊस पडला . गच्चीत खूप शेवाळ जमलं होतं . सकाळी गच्चीत काही कामासाठी गेलो तर शेवाळ असल्याने घसरून पडलो . पाय बऱ्यापैकी दुखावला गेला . बँकेत गेल्यावर साहेबांना सांगितले   कि आज पाय दुखत असल्याने लवकर निघेन व डॉक्टर कडे जाईन . दुपारी कॅश घाई घाईत जमवली . मॅनेजर ने नेहमी प्रमाणे काहीही कॅश   न मोजता सेफ ला किल्ली लावून